Sunday, 2 December 2018

thumbnail

आम्हालाही हवे आरक्षण : ब्राम्हण महासंघाची मागणीमहाराष्ट्रात मराठा समाजाला 16% आरक्षण मंजूर झाल्यानंतर, आता ब्राम्हण समाजाने पण आरक्षणाची मागणी केली आहे. आमच्या समाजाचापण आर्थिक
आणी सामाजिक मागासवर्गीय सर्व्हे व्हावा अशी मागणी अखिल भारतीय ब्राम्हण महासंघाने पुण्यात केली आहे.
मराठा आरक्षणा पाठोपाठ धनगर आणी मुस्लिम आरक्षण चर्चेत असतानाचा ब्राह्मण समाजाने पण आर्थिक मागासलेपाणाचा सर्व्हे घेण्यात येऊन आम्हाला आरक्षण अशी भूमिका घेतली आहे.

पुण्यात ब्राम्हण महासंघाचे नेते आनंद यादव हे बोलताना म्हणाले,' आज संपूर्ण ब्राम्हण समाजाची दुरवस्था झाली आहे. पूर्वीच्या काळात आणी आताचा काळात खूप फरक आहे.  आज अनेक ब्राम्हण कुटूंब आपल्या दैनंदिन गरजा पण भागवू शकत नाहीयेत. 80 लाख ब्राम्हण समाजापैकी एकूण 70% समाज आर्थिकदृष्ट्या मागास आहे. त्यामुळे आमची मागणी आहे की मागासवर्गीय आयोगाने एक समिती नेमून ब्राह्मण समाजाचा सर्व्हे करण्यात यावा. '

महाराष्ट्रत 52 आरक्षण होत, त्यात मराठा आरक्षणाची भर पडून आता तो एकडा 68% वर गेलाय. ब्राह्मण आरक्षण हे संविधानिक आहे का नाही हे आयोग ठरवेल, पण त्यामुळं महाराष्ट्रात राजकीय चर्चेला उधाण आले आहे.